41 thoughts on “पृथ्वीचे प्रेमगीत (Pruthviche Premgeet)| Kusumagraj | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

 1. Khupch Sundar Spruha mam…
  I am your big fan… specially your acting in unch mazha zhoka serial…thank you

 2. तळी जागणारा निखारा उफाळून,
  येतो कधी आठवाने वर..
  शहारून येते कधी अंग तूझ्या,
  स्मृतीने उले अन् सले अंतर…!!

  जगणं शब्दात मांडलं कुसुमाग्रजानी अन तू आज काव्यात व्यक्त केलंस स्पृहा… पण वसुंधरेला प्रीतीच्या स्पर्शाने भारावून भास्कराची गळाभेट घेण्याची परवानगी नाही दिली नियतीने स्पृहा… कारण ते इतरांच्या हिताचं नाही.. ते फक्त मैत्री जपू शकतात आयुष्यभर.. "मेलुहा-शिवा ट्रायलॉजी" मधेही हेच सांगितलं सतीने शिवाला…
  हेच सांगितलं.
  Thanks from the bottom of heart for this most touchable poem…🙏

 3. स्पृहा खूप छान कविता. असाच प्रयत्न राहू दे.

 4. खूप छान कविता आहे आणि तुम्ही सांगितली देखील सुंदर आहे

 5. कुसुमाग्रजांची अतिशय सुंदर कविता, तुमच्या आवडीची का आहे हे समजलं,पृथ्वीचे प्रेमगीत,खरोखरच मानवी मनाच्या आवाक्याच्या कक्षा ओलांडून तयार झालेली ही कविता आहे, पृथ्वी, चंद्र, सूर्य, यांचा नवीनच चेहरा आज तुमच्या मुळे समजला, तुमची प्रगल्भता व तुमचं सादरीकरण खूपच सुंदर, एवढा मोठा विश्वाचा खजिना सादर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .👌👍

 6. स्पृहा खरच खूप सुंदर कविता आहे, कुसुमाग्रजांना कोटी कोटी प्रणाम, आणि तुझेही आभाळायेवढे आभार आम्हाला इतक्या सुंदर प्रकारे तू कविता वाचून दाखवल्याबद्दल….🇮🇳👌👌👏👋

 7. स्पृहा,
  माझ्या सारख्या असंख्य चाहत्यांची इच्छा कि तू हि कविता वाचावीस. आणि तू ती आज पूर्ण केलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
  अश्याच अफलातून कवितांचं आमच्यासाठी वाचन करत रहा. तुझ्यामुळे अनेक सुंदर आणि अप्रतिम कविता सगळ्यांना आणि त्यातही नवीन पिढीला (जी वाचनापासून दूर जातीये असं बऱ्याच जणांना वाटतं )
  माहित होतील यात शंका नाही. …
  तुझ्या या उपक्रमाबद्दल तुझं मनापासून कौतुक 🙂

 8. Khup chhan Spruha madam.

  As sung by Padmaja Fenani Jogalekar madam: https://youtu.be/dbbbQF2ffoA

 9. Khup Sundar 👌👌 10th std. la hoto teva aani aaj khup varshani tuzya kadun aaikli, junya aathvani jagya zalya….. thank you very much Spruha…

 10. पृथ्वीचे प्रेमगीत – कुसुमाग्रज

  18 October 2019

  09:10

  पृथ्वीचे प्रेमगीत – कुसुमाग्रज

  पृथ्वीचे प्रेमगीत

  युगामागुनी चालली रे युगे ही

  करावी किती भास्करा वंचना

  किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी

  कितीदा करु प्रीतीची याचना

  नव्हाळीतले ना उमाळे उसासे

  न ती आग अंगात आता उरे

  विझोनी आता यौवनाच्या मशाली

  ऊरी राहीले काजळी कोपरे

  परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे

  अविश्रांत राहील अन् जागती

  न जाणे न येणे कुठे चालले मी

  कळे तू पुढे आणि मी मागुती

  दिमाखात तारे नटोनी थटोनी

  शिरी टाकिती दिव्य उल्काफुले

  परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा

  मला वाटते विश्व अंधारले

  तुवा सांडलेले कुठे अंतराळात

  वेचूनिया दिव्य तेजःकण

  मला मोहवाया बघे हा सुधांशू

  तपाचार स्वीकारुनी दारुण

  निराशेत सन्यस्थ होऊन बैसे

  ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव

  पिसाटापरी केस पिंजारुनी हा

  करी धूमकेतू कधी आर्जव

  पिसारा प्रभेचा उभारून दारी

  पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ

  करी प्रीतीची याचना लाजुनी

  लाल होऊनिया लाजरा मंगळ

  परी दिव्य ते तेज पाहून पूजून

  घेऊ गळ्याशी कसे काजवे

  नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

  तुझी दूरता त्याहुनी साहवे

  तळी जागणारा निखारा उफाळून

  येतो कधी आठवाने वर

  शहारून येते कधी अंग तूझ्या

  स्मृतीने उले अन् सले अंतर

  गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे

  मिळोनी गळा घालुनीया गळा

  तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

  मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

  अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

  मला ज्ञात मी एक धुलिःकण

  अलंकारण्याला परी पाय तूझे

  धुळीचेच आहे मला भूषण

 11. खूपच सुंदर ..मी नेहमी वाट बघतो तुझ्या कवितांची,
  💐,,🌹🌹🌹

 12. Kusumagrajanchya pratibhela 🙏🙏🙏
  Spruha tuze kavyavachan 👌👌👌

 13. कुसूमाग्रजांची कविता तर सुंदर आहे.पण त्यासारखीच तुही गोड दिसतेस.

 14. अप्रतिम कविता आणि त्याचे वाचन

 15. ती जाताना मला खुप काही देवून गेली
  जसा पाऊस बरसून बहराव्याआठविणींच्या वेली

  ती जाताना आपुलकीचा स्नेह देवून गेली
  जसा दोन कोकिळगान फांदिवरची बोली

  ती ज‍ाताना मायेचा गंध दरवळून गेली
  जसा मृगाच्या नाभीची कस्तूरीच्या चाली

  ती जाताना मला खूप काही देवून गेली
  जसा कन्हैया पाहाताना राधेच्या गालवरची लाली

  ती जाताना किरकिरिचा संवाद देवून गेली
  जशी आईची लहान बाळाला बोबड बोली

  ती जाताना प्रेमची शीळ घालून गेली
  जसा स्पंदणार्‍या ह्रदयाच्या आवाजांची खोली

  ती जाताना मनाचा बाग उमगवून गेली
  जशी बागेतल्या काटेरी गुलाबची कली

  ती जाताना निस्वार्थची बीजके रोवून गेली
  जशी उन्हां वेळी वटवृक्षाची सावली

  ती जाताना कवीतेली अोवी बनून गेली
  माझ्या कल्पकतेची वैष्णवी होवून वाहीली

  ती ज‍ाताना मला खूप काही देवून गेली

  पण जाताना संशयाचे घर घेवून गेली
  जशी भूतलावरिल खारट पाण्यची समुद्राची अोली

  Abhijeet kadam

 16. पृथ्वीचे प्रेमगीत

  होतीस सावलीत त्या नगाच्या , वाऱ्याच्या त्या सरी जाणीव माझ्या असण्याची

  अन वेद तू घेत होतीस माझ्या येण्याची नी मग जाण्याची

  स्पर्श तो जहाला एकदा , अंतः तुझ्या तो वाट बगण्याचा

  असेच तू गात राहावे , संथ प्रवाह तो आपला

  समजण्या भावना सुरांच्या , तू ना कधी ऐकणे थांबवले अन मी सांगणे .

 17. माझीही अतयंत आवडती कविता लहानपणापासून, पूर्ण आकाशगंगेच्या प्रतिकवर बांधलेली आणि तितकीच ठाम आणि हरुवाळ

 18. स्पृहाताई,
  कृपया तुमच्या वाचनातील दुसरी ओळ पुन्हा तपासून पहा. तुम्ही "कितीदा करू भास्करा वंचना " असे म्हटले आहे .यात विपरीत अर्थ होतो. वंचना पृथ्वीची होते भास्कराकडून. पृथ्वी नाहीये करत वंचना.मला वाटते मूळ ओळ "करावी किती भास्करा वंचना" अशी आहे..! Please check ,rectify and re-post… बाकी वाचन नेहमीप्रमाणेच उत्कट झाले आहे..अनेकानेक शुभेच्छा !

 19. अप्रतिम सादरीकरण स्पृहा !
  अन सुंदर कविता

 20. 'Athvani sarlya swapnachya gheun ale avachit koni' he Kavita Sadar Kara plz

 21. सुंदर…अप्रतीम सादरीकरण…नेहमीप्रमाणे

 22. वाह खूप सुंदर काव्यवाचन 🙌❤❤

 23. ताई कृपया ' सूप आणि जात ' ही कविता वाचा खूप सुंदर आहे .

 24. धन्यवाद स्पृहाजी
  खूप छान सादरीकरण 👌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *