होडी (Hodi)| Spruha Joshi | Marathi Kavita | Poemsस्वप्न विकायला काढलेला एक वेडा परवा फिरत होता आपल्याच शहरातल्या गल्ल्यांमधून.. स्वप्न विकायला काढलेला एक वेडा परवा फिरत होता आपल्याच शहरातल्या गल्ल्यांमधून.. ओरडत होता, "हे सगळं फुकट आहे; फक्त तुमचे डोळे मला एकदा तपासू द्या. ही स्वप्न पहायची ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढं मला कळलं की बस !! मग हे सारं तुमचं!" लोक हसले त्याला, खूप हसले! लोक हसले त्याला, खूप हसले! त्याच्या डोळ्यातलं वेड उतरलंच नाही पण शेवटपर्यंत.. काल रात्री समुद्राच्या काठाशी पाहिलं त्याला कोणी कोणी, अखेरचं.. काल रात्री समुद्राच्या काठाशी पाहिलं त्याला कोणी कोणी, अखेरचं.. लाटांमध्ये जाताना किना-यावर भिरकावून दिली एक होडी त्याने, लाटांमध्ये जाताना किना-यावर भिरकावून दिली एक होडी त्याने, म्हणाला, "माझ्या मागे येईलच एखादा वेडा. स्वप्नांमध्ये बुडता बुडता कोणाच्याच हाती किनारा लागला नाही, असं नको व्हायला..!!" होडी काठावर अजून हिंदकळतेच आहे..

26 thoughts on “होडी (Hodi)| Spruha Joshi | Marathi Kavita | Poems

 1. https://www.youtube.com/channel/UCehZPf7BnJAoi7mPlOEejDw
  मी ही छोटासा प्रयत्न केला आहे. मराठी कविता चिरकाल टिकविण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनामनात रुजवण्यासाठी. तुमचा प्रतिसाद खूप लाख मोलाचा असेल तर एकदा भेट नक्की च द्या माझ्या चॅनल ला. सध्या सगळ मोबाईल वरच Recording, editing केलंय भविष्यात नक्की बदल घडेल ते फक्त तुमच्या साथी ने. ध्यन्यवाद

 2. Khup khup khup chhaan Spruha Ma'am!👏👏👌👌👌👌 kharach Swapnanchya pathimage Dhavana Itaka Sopp Nasata!

 3. स्वप्नांमध्ये बुडता बुडता

  कोणाच्याच हाती किनारा लागला नाही,

  असं नको व्हायला..!!

  वाह..!

 4. सापडेल भटकतांना,एखादीला होडी
  जाईल लाटा शोधत ,काव्यसागरात वेडी……!अरूणा….
  स्पृहा , सुंदर भावदर्शी कविता!
  धन्यवाद!👌👌

 5. Khuppach mast.. Apratim.. 👏👏👏👌👌👌👌👍🌹🌹🌹🌹🌹

 6. Wow spruha Tai..khupch chan..tujhya sglyach kavita khup chan astat..mi sglya kavita aikte tujhya Punha Punha.. tujhya ya kavita ni bharun yet agadi ani manala ubhari milate …its really heart touching…I am waiting for the nxt😊…love u..😍😍😍

 7. Tujhya kawitet ass Kay TR mahit nhi aayklya shiway rahawt nhi … Khup Chan kawita ahe..

 8. खूप खूप सुंदर कविता स्पृहा ताई

 9. किनाऱ्यावर रेंगाळणाऱ्या होडीचा मिळेल आधार या वेड्याला ,thank u होडी शेवटी सोडल्याबद्दल

 10. सुंदर ,तुमच्या कवितांची वाट पाहत असतो मी, ,जरी मी आता कविता करायच्या बंद केली तरी, ऐकायला आवडतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *